Monsoon update 2025 : यंदा देशात कसा राहणार पाऊस नोआचा सुधारित अंदाज व्येक्त.
Monsoon update 2025 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, जागतिक हवामान संस्था नोआकडून 2025 चा मान्सून कसा राहील या बदल अंदाज व्येक्त करण्यात आला आहे. तसेच यंदा एलनिनो किंवा लानिनाचा प्रभात मान्सूनवर पडणार का? याबाबत ही नोआने खुलासा केला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार का? याबाबत जागतिक हवामान खात्याने सविस्तर माहिती दिली आहे.
जागतिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा म्हणजे 2025 मध्ये चांगला पाऊस बरसन्याची शक्यता जागतिक हवामान खात्याने दिली आहे. हवामान संस्था नोआच्या प्रथम दिलेल्या अंदाजानुसार भारतात ला निना सक्रिय राहाण्याचा अंदाज असून, मान्सूनच्या काळात IOD सुद्धा सकारात्मक होण्याची शक्यता असल्यामुळे यंदा पावसाचे प्रमाणे हे सरासरीपेक्षा जास्त असणार आहे.
जागतिक हवामान संस्था नोआ ने महाराष्ट्रासाठी दिलेल्या अंदाजानुसार जुनपर्यंत स्थिती अशीच असेल. नंतर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र यंदा देशात चांगला मान्सून बरसणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे.
जागतिक हवामान संस्थाचा परत मान्सूनचा सुधारित अंदाज हा एप्रिलमध्ये जाहीर होईल. तसेच भारतीय हवामान खात्याचा सुद्धा सुधारित अंदाज हा एप्रिल मध्येच जाहीर होणार आहे. त्या अंदाजामध्ये कुठे किती पाऊस पडणार हे स्पष्ट होईल. तरी सध्या जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ह्या वर्षी देशात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.