Shetkari yojana : शेतकऱ्यांना मिळणार लाडकी बहीण योजनेप्रमाणे पैसे पहा.
Shetkari yojana : शेतकरी मित्रांनो नमस्कार, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणत असून शेतकऱ्यांना त्यांच्या थेट बँक खात्यात पैसे मिळतील याकरिता हस्तांतरण (DBT) लाभ बळकट करणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी विभागाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणाले की, राज्यात लाडक्या बहिणींना जसे पैसे भेटतात त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात कसे पैसे जातील यावर भर दिला जाईल. आणि कृषी विभागाचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल करण्यात येईल. राज्यात पीकविमा संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला जात असून, त्याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.
पीकविम्याच्या घोटाळ्याची चौकशी करून जे तथ्य समोर येईल ते उगड करण्यात येईल. शेतकरी मित्रांनो अशाच नवं नवीन अपडेट साठी आपल्या वेबसाईटला भेट देत करा धन्यवाद..