Maharashtra District New : महाराष्ट्रात नवीन जिल्हे होणार का? काय आहे सत्य परिस्थिती पहा.

Maharashtra District New : महाराष्ट्रात नवीन जिल्हे होणार का? काय आहे सत्य परिस्थिती पहा.

 

Maharashtra District New : गेल्या अनेक दिवसापासून राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार अशी बातमी सोशल मीडियावरती वायरल होत आहे. खरच राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का? याबाबत आपण सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया.

सन 01 में 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण 26 जिल्हे होते. त्यानंतर काही दिवसांनी 10 जिल्हे समाविष्ट करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून, गेल्या दहावर्षां पूर्वी 2014 मध्ये पालघर जिल्हा निर्माण झाला. महाराष्ट्र राज्याचे 36 जिल्हे नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा 06 विभागात विभागले गेले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून राज्यात 21 जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याची माहिती सोशल मीडिया वर चांगलीच वायरल होत आहे. मात्र ह्या बातमीला कुठलाही पुरावा नाही. राज्यात 21 नवीन जिल्हे निर्माण होणार असल्याच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून सरकारी पातळीवरून अशी कोणतीही घोषणा किंवा निर्णय झालेला नाही. राज्यात काही नवीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी वेळोवेळी केली जाते. परंतु सरकारी पातळीवर असा कोणताही निर्णय किंवा घोषणा झालेली नाही. Maharashtra District New

Leave a Comment

Close Visit kisan.agromedia24