पीएम किसान योजना : या दिवशी येणार 19 वा हप्ता सविस्तर माहिती पहा.
देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारने 2019 पासून पीएम किसान योजना अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक 06-हजार रुपये दिले जातात. हे पैसे चार महिन्याच्या टप्प्यात दिले जातात. तसेच हे पैसे शेतकऱ्यांना DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते हस्तातरीत केले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
सदर योजनेमध्ये बोगस लाभार्थी असल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केली असता. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पुढील हप्ते देणे बंद करण्यात आले आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. ई- केवायसी असले तरच योजनेचा लाभ मिळेल.
सदर योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांना 24/फेब्रुवारी/2025 रोजी बिहारयेथील एका कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली आहे. तसेच त्यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी, बँक आधार लिंक, आधार सिडींग स्टेटस ऍक्टिव्ह या पैकी काही अपूर्ण असेल तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
शेतकरी मित्रांनो..पिएम किसान योजनेचे स्टेट्स चेक करण्यासाठी (pmkisan.gov.in) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेज वरील (फार्मर कॉर्नर) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर स्टेटस समजून घ्या या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाका. गेट ओटीपीवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून..तुम्हाला पिएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येईल. हि माहिती उपयुक्त वाटल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा…धन्यवाद..